महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त महापारेषणमध्ये ध्वजवंदन
01-May-2025
Total Views |
मुंबई, महाराष्ट्र राज्य ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. संचालकांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. मंगेश शिंदे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, अधीक्षक अभियंता श्री. अमित नाईक, श्री. सचिन खडगी, श्री. विशाल वाघचौरे, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) तथा राजशिष्टाचार अधिकारी श्री. सतिश जाधव, व्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. पारस सवाई, श्रीमती अश्विनी तेरकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.