परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांची अमेरिका आणि द. कोरियासोबत चर्चा

    01-May-2025
Total Views |
परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांची अमेरिका आणि द. कोरियासोबत चर्चा

नवी दिल्ली,  परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.

"काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्यासोबत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली. हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि योजना आखणाऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, यावर आमचे एकमत आहे" असे जयशंकर यांनी एक्सवर म्हटले आहे.

चर्चेदरम्यान, रुबियो यांनी दहशतवादाविरुद्ध भारतासोबत सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त करताना, रुबियो यांनी भारताला तणाव कमी करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करण्यास प्रोत्साहित केले, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी त्यांचे दक्षिण कोरियाचे समकक्ष चो ताई-युल यांच्याशी फोनवर चर्चा केली. चर्चेदरम्यान, जयशंकर यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा परराष्ट्परमुकाबला करण्याची गरज अधोरेखित केली. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीबद्दल जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले.