हिजाबच्या हट्टापायी सादियाचा बळी! जोधपूर सिलेंडर स्फोटात १४ महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू

09 Apr 2025 14:14:41

teenage girls death due to hijab insistence jodhpur cylinder explosion
 
 
(छायाचित्र : प्रतिकात्मक) 
 
जोधपूर : (Jodhpur cylinder explosion) राजस्थानमधील जोधपूरच्या गुलाब सागर परिसरात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात १४ महिन्यांच्या मुलांसह दोन जणांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर भाजले आहेत. सोमवारी ७ एप्रिल रोजी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. यात हाशिम (१४ महिने) आणि सादिया (१९ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
 
माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानुसार , मोहम्मद सत्तार चौहान यांच्या घरात सायंकाळी ४.३० च्या सुमारास, स्वयंपाक करताना गॅस गळती झाली, ज्यामुळे घरात ज्वलनशील फर्निचरचे साहित्य असल्याने आग वेगाने पसरली. तेव्हा शेजाऱ्यांनी घरात अडकलेल्या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सादिया देखील त्यांच्यात होती. आग लागल्यानंतर लोकांनी तिला घराबाहेर काढले, पण सादिया तिचा हिजाब आणण्यासाठी घराकडे धावत असताना, आगीने पेटलेला दरवाजा तिच्यावर पडला. यानंतर, लोकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
 
नागौरी गेट येथील स्थानिक रहिवासी मोहम्मद इम्रान यांनी सांगितले की, उमराह (मक्का आणि मदिना येथील तीर्थयात्रा) साठी निघणाऱ्या २०-२५ लोकांसाठी कुटुंबाच्या जेवणाची तयारी सुरू होती. सादिया देखील १० एप्रिल रोजी उमराहसाठी जाणार होती. तिच्या नातेवाईकांनी सांगितले की, सादिया वयाच्या ११ व्या वर्षापासून पडदा पध्दत पाळत होती आणि घटनेच्या वेळी ती दुसऱ्या मजल्यावर नमाज करत होती.
 
Powered By Sangraha 9.0