पाटणा : बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधित आरोपी हा कोइनीखान गावातील असून त्याचे नाव हे साजिद अली असून त्याचे वय वर्षे हे १९ आहे.
घटनेसंबंधित डीसीपी संदीप कुमार यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२५ रोजी कोइनी बाजारपेठेतील एका बागेत एका युवतीचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला होता. संबंधित घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी पोलीस तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक मोबाईल लागला होता. त्यावेळी त्यांनी एका युवतीच्या गळ्यात फास अडकवल्याचे पाहिले होते. ती युवती मृतावस्थेत दिसत होती, त्यानंतर घटनास्थळी एफएसएलचे पथक दाखल झाले होते. एफएसएल पथकाने मृतदेहाची तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी काही तांत्रिक पथकाच्या मदतीने मृत्यू झालेल्या युवतीच्या मोबाईलचा आधार घेत तिची ओळख पटवण्यास मदत झाली. त्यातूनच मृत्यू झालेल्या युवतीचे नाव हे रिया कुमारी असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. रिया ही कोइनी खान या गावातील निवासी होती. ती साहिल अलीसोबत मागील काही महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. ईद दिवशीच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे दोघामध्ये शिवीगाळ झाली. यामुळे आता तिच्या निकटवर्तीयांचा आरोप आहे की, तिला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रात्री तिचा मृतदेह एका झाडाला टांगलेला दिसून आला होता.
पोलिसांचे म्हणणे आहे की, घटनास्थळावरून पीडितेचे घर एक किमी अंतरावर होते. तर प्रियकराचे घर हे केवळ ४०० किमी अंतरावर होते. मृत्यू झालेल्या पीडितेच्या वडिलांनी संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर साजिद खानने सांगितले की मी तिच्यासोबत कोणतेही वाईट काम केले नाही. त्यानंतर त्याने पीडितीला कोणी मारले आहे, याबाबत मला माहिती असल्याचा दावा केला. पीडितेचा खून करण्यात आला आहे. मात्र, त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्यात आल्याचे तक्रारीच नमूद करण्यात आले. शवविच्छेदनाचे अहवाल आले नसल्याने अद्यापगही कारण समोर आलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.