Ram Navami ! कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात इफ्तार पार्टीला परवानगी अन् रामनवमीला विरोध

ममता सरकारची प. बंगालमध्ये अराजकता

    04-Apr-2025
Total Views |

Ram Navami
 
कोलकाता (Ram Navami): प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
 
अशातच आता जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारात राम नवमी उत्सव साजरा करण्यासाठी २८ मार्च रोजी पत्र लिहून विद्यापिठाकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने ३ मार्च रोजी राम नवमीच्या उत्सवासाठी परवानगीविषयी एक बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीतील सदस्यांनी याला विरोध केला होता.
 
 
 
यामागे विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने काही तर्क लावले होते. पहिले म्हणजे विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राम नवमी साजरी करण्याची परंपरा नसल्याचं बोललं गेलं. विद्यापीठाच्या प्रशासनाने म्हटले की, मागील वर्षीही राम नवमी साजरी करण्यास परवानगी देण्यात आली नाही. विद्यापीठाच्या प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आता याबाबत निर्णय घेणे उचित नसणार असे चर्चेतून समोर आले.
 
विद्यापीठाच्या प्रशासनाकडे अर्ज सादर करत राम नवमी साजरी करण्यापासून आडून आहेत. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भाजपने साथ दिली आहे. राज्यात ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असून त्यांचे सरकार आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, बंगालच्या ममता बॅनर्जींचे सरकार जाणुनबूजून ईद आणि इफ्तार पार्टी करण्यास परवानगी देते, हीच वृत्त हिंदूप्रति अन्याय असल्याचा दावा एबीवीपी यांनी केला असून आता विद्यार्थी संघटना याविरोधात लढत आहेत.