राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल! माजी RAW प्रमुख आलोक जोशींची अध्यक्षपदी नेमणूक

30 Apr 2025 14:58:26
 
national security advisory board revamped ex raw chief alok joshi appointed head
 
नवी दिल्ली : (National Security Advisory Board Revamped) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्‌लागार समिती (NSAB) मध्ये मोठे बदल केले आहेत. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग अर्थात रॉचे माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
 
माजी रॉ प्रमुख आलोक जोशी या नेमणुकीबरोबरच या समितीत इतर सहा सदस्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्‌लागार समितीत माजी एअर कमांडर पी. एम. सिन्हा, माजी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, रिअर अ‍ॅडमिरल मोंटी खन्ना, राजीव रंजन वर्मांसह लष्करी व भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
एनएसएबी ही एक बहु-विद्याशाखीय संस्था आहे ज्यामध्ये सरकारबाह्य प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी असतात. प्रामुख्याने भारतीय लष्कर, गुप्तचर यंत्रणा, भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी या समितीत काम करतात. देशाच्या सुरक्षेसंबंधीच्या मुद्द्यांचं विश्लेषण प्रदान करणे, सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांवर उपाय व धोरणात्मक पर्यायांची शिफारस करणे हे या पथकाचं प्रमुख काम आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0