मुंबई विभागातील खासदारांची मध्य रेल्वेत बैठक

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह मुंबई विभागातील माननीय खासदारांची भेट घेतली

    30-Apr-2025
Total Views | 15
मुंबई विभागातील खासदारांची मध्य रेल्वेत बैठक

मुंबई, मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि इतर पायाभूत सुविधांच्या माहितीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी बुधवार,दि.३० रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई यांच्यासह मध्य रेल्वे मुख्यालय इमारतीतील "चिंतन" कॉन्फरन्स रूममध्ये सर्व खासदारांची भेट घेतली.

या भेटीत खासदार श्रीरंग आप्पा बारणे, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के, राजाभाऊ प्रकाश वाजे, चंद्रकांत हंडोरे आणि धैर्यशील पाटील यांनी मुंबई विभागातील विकास कामे, प्रवासी सुविधा, स्थानक सुधारणा योजना, पायाभूत सुविधांची कामे आणि रेल्वेवरील इतर विविध मुद्द्यांवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सुरुवातीला महाव्यवस्थापकांनी खासदारांचे शाल आणि नारळ देऊन स्वागत केले. स्वागत भाषणात मीना यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सहकार्याचे आणि प्रेरणेचे कौतुक केले आणि पुढे सांगितले की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवल्या जातील.मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांनी मुंबई विभागाच्या कामगिरीबद्दल सादरीकरण केले.



अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121