रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम करा अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

30 Apr 2025 18:36:42

रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी!


मुंबई
: रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्ड केवायसी साठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. पुढच्या काही तासांत ही मुदत संपणार आहे. ज्या रेशनकार्ड धारकांनी अद्याप केवायसी केली नसेल तर त्यांच्यासाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना रेशनच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ई-केवायसीसाठी आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

ऑनलाईन पद्धतीने केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम 'Aadhar FaceRD' हे अॅप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचे आहे. यानंतर त्या अॅपमध्ये , तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचे नाव, तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाकायचा आहे. यानंतर ‘फेस ई-केवायसी’ हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यावर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे.

सर्व माहिती भरल्यावर आणि चेहरा योग्यरीत्या स्कॅन झाल्यास केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल. अश्या पद्धतीने घरबसल्या आता ई केवायसी करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. आपले रेशनकार्ड बंद होऊ नये, यासाठी सगळ्या रेशनकार्ड धारकांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.


Powered By Sangraha 9.0