नवी दिल्ली : दहावी बारावीच्या सीआयएससी, आयसीएसई तसेच आयसीई बोर्डाचे निकाल जाहीर झाले. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता हे निकाल जाहीर झाले. १०वीच्या परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान आणि १२वी च्या परीक्षा १३ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान पार पडल्या होत्या.
परीक्षांचे निकाल cisce.org किंवा results.cisce.org ह्या संकेतस्थळावर पाहता येतील. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला युआयडी कोड, इंडेक्स नंबर, जन्म तारीख आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. निकाल पहाण्यात काही अडचण जाणवल्यास विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या CISCEच्या अधिकृत संकेतस्थळांवरही निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि निराशेचे प्रमाण लक्षात घेता यंदाच्या वर्षीही सीआयएससीईने मेरिट लिस्ट न लावायचा निर्णय घेतला आहे. या बोर्डात १०वी उत्तीर्ण होण्यासाठी ३३% तर १२ उत्तीर्ण होण्यासाठी गरजेचे आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर पुर्नतपासणी प्रश्नपत्रिका द्यायची असल्यास cisce.org या अधिकृत संकेतस्थावर जाऊन नोंदणी करू शकता. कॉलेज प्रवेशांविषयी माहिती लवकरच cisce.org च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
मुलींनी मारली बाजी..
या वर्षी च्या १०वीच्या ICSE निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ९९.३७% मुली आणि ९८.८४ टक्के मुले उत्तीर्ण झाली..