माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे निधन!

30 Apr 2025 18:56:41
 
Ramdas Ambatkar
 
मुंबई : माजी आमदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, माजी प्रदेश सरचिटणीस तसेच विदर्भ विभागाचे माजी संघटन डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवार, ३० एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
गेल्या पंधरा दिवसांपासून श्वसनासंबधी त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण आणि संघटनात्मक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राजकीय नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? - जातनिहाय जनगणनेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "भविष्यात जातीव्यवस्था संपुष्टात..."  
 
विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्या गावात रामदास आंबटकर यांचा जन्म झाला. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार दूरवर पोहोचवण्याचे काम केले. विशेषतः विदर्भाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0