अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगल्यात गृहप्रवेश!

30 Apr 2025 14:36:19
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, आपली मुलगी दिविजा हिची दहावीची परीक्षा संपल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकदा स्पष्ट केले होते. आतापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस हे सागर बंगल्यावर वास्तव्यास होते. आता अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांनी वर्षा या निवासस्थानी छोटीशी पूजा संपन्न करत गृहप्रवेश केला.
 
हे वाचलंत का? -  ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
 
दहावीच्या परीक्षेत दिविजाला ९२.६० टक्के गुण
 
दहावी बोर्डाच्या परीक्षेत दिविजा ही ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली असल्याची माहितीही यावेळी अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0