देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

30 Apr 2025 16:12:21

देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त


मुंबई, भारतीय पोलीस सेवेतील १९९४च्या तुकडीचे डॅशिंग अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती यांना मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.


विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सेवा निवृत्त होत झाले. त्यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपद अशा महत्त्वाच्याच पदांवर कार्यरत होते. याशिवाय मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची धुराही त्यांनी सांभाळली.

गेल्या दोन वर्षांपासून ते मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत. आता त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0