राज्यात ‘फेसलेस नोंदणी’ व ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ - महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय

१ मे पासून अंमलबजावणी : बावनकुळे

    03-Apr-2025
Total Views | 26

One State One Registration in the state decision of the Revenue Department 
 
मुंबई : ( One State One Registration in the state decision of the Revenue Department ) राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला असून, १ मे २०२५ पासून ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
मुंबईत माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “आता नागपूरमध्ये घर घेत असाल, तरी पुण्याहूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आधार कार्ड आणि इनकम टॅक्स प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा चेहरा नोंदणीसाठी वापरण्याची सुविधा मिळणार आहे.”
 
या निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील. "डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा संकल्प आहे, आणि आम्ही त्यावर काम करत आहोत," असेही बावनकुळे म्हणाले.
 
अधिक सोपे आणि पारदर्शक होणार
 
नवीन महसूल प्रणालीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात घर खरेदी-विक्री, जमीन व्यवहार आणि नोंदणी अधिक सुटसुटीत आणि सुलभ होणार आहे.
 
अरे कहना क्या चाहते हो?
 
उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.
 
संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.
 
अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121