भैय्याजी जोशी यांना बंधुशोक

    03-Apr-2025   
Total Views |

Arvind Joshi passed Away

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Arvind Joshi Passed Away)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्ये ज्येष्ठ बधू अरविंद जोशी यांचे गुरुवार, दि. ०३ एप्रिल रोजी निधन झाले. धर्म, समाज आणि राष्ट्रसेवा हाच आपल्या जीवनाचा संकल्प मानणारे म्हणून त्यांची विशेष ओळख होती. इंदुरच्या रामबाग मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचलंत का? : हिंदूंचा नरसंहार नाकारणारे हिंदूंसमोरच पसरतायत झोळी

अरविंद जोशी हे मध्य प्रदेशच्या माळवा प्रांतातील विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यालय मंत्री तसेच मंडलेश्वर स्थित माधवाश्रम न्यास गौशाळेचे संस्थापक व माजी अध्यक्ष देखील होते. त्यांच्या समर्पित जीवनाने संस्थेला आणि समाजाला एक अविस्मरणीय दिशा दिली होती. त्यांचे संपूर्ण जीवन देशभक्ती, हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि सेवेसाठी समर्पित होते. त्यांची प्रेरणादायी मेहनत आणि निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक