वैभव सुर्यवंशीचे दमदार शकत! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही भारावला! म्हणाला, "वैभव तु..."

29 Apr 2025 14:26:17
वैभवच्या खेळीवर क्रिकेटचा देव: “खूप छान खेळलास!”
 
 
मुंबई: आयपीएलच्या रंगतदार सामन्यात १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने केवळ ३८ चेंडूंमध्ये झंझावाती १०१ धावा करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
सामन्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया देताना सचिनने लिहिलं, “दृष्टिकोन, फलंदाजीचा वेग, चेंडूची अचूक ओळख, आणि बॅटमधून होणारी एनर्जी ट्रान्सफर... ही एका उत्कृष्ट खेळाडूची लक्षणं आहेत. वैभव, तू या वयात जी खेळी केलीस ती वाखाणण्याजोगी आहे. खूप छान खेळलास!”

वैभवने खेळीची सुरुवातच आक्रमक केली होती. त्याने चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याची ही खेळी केवळ संघासाठी नव्हे तर स्वत: च्या करिअरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकते, असे क्रिकेट विश्लेषकांचे म्हणणे आहे.
क्रिकेटरसिकांनीही सोशल मीडियावर त्याच्या खेळीचे कौतुक करत अनेक पोस्ट्स शेअर केल्या आहेत. काहींनी त्याला “युवा विराट” आणि “नवा सुपरस्टार” असंही म्हटलं आहे.
सचिन तेंडुलकरांच्या ट्विट वर वैभव आपले वक्तव्य मांडताना म्हणाला, “सचिन सरांकडून कौतुक मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी अजून मेहनत करणार आहे.”

Powered By Sangraha 9.0