दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ

29 Apr 2025 14:02:07

tahawwur rana 
 
नवी दिल्ली (Terrorist Tahawwur Rana): राष्ट्रीय राजधानीतील ‘पटियाला हाऊस कोर्टा’ने सोमवारी २६/११ चा कट रचणारा इस्लामी दहशतवादी तहव्वूर राणा याच्या ‘राष्ट्रीय तपास संस्थे’च्या (एनआयए) कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ केली आहे.
 
दहशतवादी राणाच्या १८ दिवसांच्या ‘एनआयए’ कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला विशेष ‘एनआयए’ न्यायाधीश चंदरजीत सिंह यांच्यासमोर हजर केले. ‘एनआयए’च्यावतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी युक्तिवाद केला.
‘दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणा’चे वकील पियुष सचदेवा यांनी राणाची बाजू मांडली. ‘एनआयए’ची तहव्वूर राणाची कोठडी आणखी १२ दिवस वाढवण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली.
 
 
Powered By Sangraha 9.0