१४ वर्षीय वैभवने रचला नवा विक्रम, स्फोटक खेळीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष

29 Apr 2025 12:58:19

१४ वर्षीय वैभवने रचला नवा विक्रम, स्फोटक खेळीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष 
जयपूर: नवोदित खेळाडू वैभव सुर्यवंशीने आयपील मध्ये शतक ठोकत एकाच सामन्यात अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केला. फक्त १४ वर्षे ३२ दिवस वय असलेल्या वैभवने टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरायचा पराक्रम केला आहे.
त्याने ३२ चेंडूत शतक ठोकत आयपीलमधील सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय खेळाडू ठराण्याचा मान पटकावला आहे. आयपीलच्या इतिहासातील हे दुसरे जलद शतक आहे. याआधी ख्रिस गेलने ३० चेंडूत शतक ठोकले होते.
याच सामन्यात वैभवने ११ षट्कार ठोकून एकाच सामन्यात सर्वाधिक षट्कार मारायच्या रेकॉर्डची देखील बरोबरी केली. अश्या दमदार खेळीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच कौतुक करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळतो.
अशा ऐतिहासिक कामगिरीनंतर वैभव सुर्यवंशीचं नाव क्रिकेटच्या यशस्वी वाटचालीत ठळक अक्षरात नोंदवलं जाणार आहे. क्रिकेटप्रेमी आणि जाणकारांनी त्याच्या कौशल्याचं आणि संयमाचं भरभरून कौतुक केलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0