मुंबई : काँग्रेस आणि विजय वड्डेट्टीवार आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत, असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे. जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर भाजपने त्यांना खडेबोल सुनावले आहे.
भाजपच्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये काँग्रेस आणि वडेट्टीवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या निष्पाप हिंदूंच्या कुटुंबियांनी, जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, आतंकवाद्यांनी मारण्यापूर्वी नाव, धर्म विचारलe. परंतू, काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याचा प्रयत्न करत आहे."
हे वाचलंत का? - पहलगाम हल्ल्यावरून वडेट्टीवार बरळले! म्हणाले, "जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ..."
"काँग्रेस आघाडीच्या या व्होट जिहादला जनतेने वारंवार नाकारले आहे. तरीही तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस अजूनही तेच घाणेरडे राजकारण करत आहे. अनेकांनी आपल्या घरातील व्यक्ती गमावल्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि वड्डेट्टीवार आतंकवाद्यांचे सहानभूतीकार बनून आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत," असा घणाघात भाजपकडून करण्यात आला आहे.