मुंबई, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.
या मोहिमेचा उद्देश आईच्या नावाने एक झाड लावणे आणि एक चिरस्थायी स्मृती निर्माण करणे आहे, जे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणार नाही तर हिरवेगार आणि अधिक समृद्ध भविष्य घडवण्यास देखील हातभार लावेल.
५ जून २०२५ रोजी या मोहिमे ला १ वर्ष पूर्ण होईल असे मोदी यांनी मन की बात मध्ये म्हणाले. तसेच या वर्षी एकूण १.४ बिलियनहून अधिक झाडे लावण्यात आली. भारताचा हा उपक्रम पाहुन परदेशी ही लोकानी त्यांच्या आईच्या नावाने झाडे लावली आहेत. तुम्हीही यात भाग घ्या, असे मोदी म्हणाले,