पाकिस्तानची पुन्हा धमकी ...... पाणी नाही तर रक्त

26 Apr 2025 18:48:04
पाकिस्तानची पुन्हा धमकी ...... पाणी नाही तर रक्त
 
 
मुंबई : पहलगाम हल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बिलावल भुट्टो ह्यांनी भारताला धमकी दिली. सिंधू नदी आमची आहे.. पाणी नाही आल तर रक्ताचे झरे वाहतील.. असा इशारा दिला.
 
भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले जाणार नाही. हा निर्णय ठाम आहे. भारत आता पाण्याचा उपयोग स्वतःसाठी करणार आहे. शेती आणि उद्योगासाठी हे पाणी वापरले जाईल.
 
पाकिस्तान सिंधू जल करारावर अवलंबून आहे. पाणी थांबल्यास अडचणी वाढतील. तिथल्या जनतेला त्रास होईल. त्यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले आहे. तरीही पाकिस्तान भारतावर आरोप करतोय. धमक्या देऊन काही साध्य होणार नाही. भारत आपली सुरक्षा आणि हित पाहतो आहे.
 
ज्यांनी हल्ला केला, त्यांना फटका बसणारच. भारत आता मागे हटणार नाही! शांती हवी असेल, तर हिंसाचार थांबवावा लागेल. नाहीतर परिणाम भोगावे लागतील.
 
Powered By Sangraha 9.0