पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ भारत देश सोडावा, अन्यथा...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

    25-Apr-2025
Total Views | 33
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : पाकिस्तानी नागरिकांनी वेळेत देश सोडून जावे. कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शुक्रवा, २५ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत सरकारने देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगितले आहे. असे कोणकोणते नागरिक महाराष्ट्रात आहेत त्यांची यादी तयार झाली असून आम्ही मॉनिटरिंग करतो आहोत. त्यांनी वेळेत देश सोडून जावे यादृष्टीने देखरेख केली जाईल आणि कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक कुठल्याही परिस्थिती भारतात किंवा महाराष्ट्रात राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. पाकिस्तानी अभिनेते किंवा पाकिस्तानी खेळाडूंबद्दल आमच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
हे वाचलंत का? -  निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
 
उबाठा गटाला जनता माफ करणार नाही!
 
"मला या गोष्टीचे अतिशय दु:ख आहे की, या देशाचा इतिहास ते विसरले. देशात युद्धाची वेळ असेल, युद्धसदृश परिस्थिती असेल, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादा विषय असो याबाबतीत देशातील राजकीय पक्षांनी कधीही पक्ष बघितलेला नाही, हा देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी देशात पक्षा-पक्षांमध्ये टोकाची लढाई सुरु होती. पण त्यावेळीसुद्धा अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना पूर्ण समर्थन दिले होते. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशाही परिस्थितीत विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारखे वक्तव्य करणं हे उबाठा गटाकडून सुरु असून देशाची जनता त्यांना माफ करणार नाही," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121