दहशतवाद्यांसमोर अजाण म्हटली, कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या...! कौस्तुभ गणबोटेंच्या नातेवाईकांनी सांगितली आपबिती

24 Apr 2025 18:05:50
 
Sharad Pawar
 
पुणे : आम्हाला मारू नये यासाठी आम्ही कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या आणि दहशतवाद्यांसमोर अजाण म्हटली. तरीसुद्धा त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकले, अशी आपबिती पहलगाममधील हल्ल्यात मृत पावलेले कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितली.
 
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार, २४ एप्रिल रोजी शरद पवारांनी पुण्यात त्या दोघांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तिथला थरारक अनुभव पवारांसमोर वर्णन केला.
 
हे वाचलंत का? -  किरीट सोमय्यांना धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारीला अखेर बेड्या!
 
"दहशतवाद्यांसमोर आम्ही सर्व महिलांनी मोठमोठ्याने अजाण म्हटली. पण त्यांनी तरीही आमच्या माणसांना मारुन टाकलं. आम्हाला त्यांनी मारु नये म्हणून आम्ही पटापट कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहू अकबर म्हणायला सुरुवात केली. पण तरीसुद्धा त्यांनी आमच्या सोबतच्या दोघांना मारून टाकलं," असा भयंकर अनुभव कौस्तुभ गणबोटे यांच्या नातेवाईकांनी पवारांसमोर सांगितला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0