एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद

24 Apr 2025 18:17:57



Elphinstone Bridge will be closed for Transportation


मुंबई, शहराच्या मध्यवर्ती भागातील १२५ वर्षे जुना एलफिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर काल रात्री शुक्रवार, दि.२४ रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये काही ठिकाणी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर ७ मार्ग ‘नो पार्किंग’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

परेल व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व - पश्चिमेला जोडणारा एलफिन्स्टन ब्रिज तोडून त्याठिकाणी नवीन ब्रिज तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्‌डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी एलफिन्स्टन ब्रिजमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. रहिवाशी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करत एलफिन्स्टन ब्रिज शुक्रवार, दि.२४ रोजी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन रुग्णवाहिकांची सोय

परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या व येण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत दोन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आलेली आहे. एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे पादचारी पूल येथे व दुसरी रूग्णवाहिका परेल रेल्वे स्थानक पूर्व येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच या रुग्णवाहिकेसोबत रुग्णांकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

करी रोड रेल्वे पुलावरील वाहतूक नियोजन
 
-महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारतमाता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू राहील.

-महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) शिंगटे मास्तर चौककडून कॉग्रेड कृष्णा देसाई चौककडे (भारतमाता जंक्शन) जाणारी वाहतूक दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत एक दिशा चालू राहील.

-महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) दोन्ही वाहिन्या रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूकीसाठी चालू राहील.
नो पार्किंग मार्ग

-ना.म. जोशी मार्ग : कॉमेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाकापर्यंत दोन्ही वाहिनी.

-सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही २ वाहिनी.

-महादेव पालव मार्ग : कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकपर्यंत दोन्ही वाहिनी.
-साने गुरूजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉग्रेड गुलाबराव गणाचार्य चौकपर्यंत (आर्थर रोड नाका) दोन्ही वाहिनी.

-भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौक पर्यंत दोन्ही वाहिनी.

-रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्चपर्यंत दोन्ही वाहिनी.

-संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहीन्या.
 
वाहतूकीस दुहेरी मार्ग चालू

-सेनापती बापट मार्ग : वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता

-दादर पूर्वेकडून दादर पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.

-परेल पूर्वकडून प्रभादेवी व लोअर परेलला जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत).

-परेल, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता

-दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.

-प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत).

-कोस्टल रोड व सी-लिंक व प्रभादेवी, वरळीकडून परेल, भायखळा पूर्व कडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.


Powered By Sangraha 9.0