लखनऊमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट, आठवड्यातील दुसरी घटना

    23-Apr-2025
Total Views | 10

Train Attack
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील रेल्वे ट्रॅकला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना आठवड्यातून दुसऱ्यांदा घडली असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी बक्कस-उत्रेथिया रेल्वे ठाणेदरम्यान डाउन लाईनवर रेल्वेलाईनवर एक मोठा लोखंडी दरवाजा ठेवण्यात आला होता, ज्यात अवजड वाहनामुळे अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला आढळले की पँड्रोल क्लिपही अवजड वाहनासोबत गायब करण्यात आली होती.
 
ठाणे प्रभारींनी मोबाईल फोनद्वारे घटनेची माहिती मिळाली असता, त्यानंतर गँगस्टर दुर्गेशला तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले होते. प्राथमिक तापासामध्ये कट रचवल्याचे सिद्ध करण्यात आले. ठाणे प्रभारींच्या तक्रारीवरून सुशांत गोल्फ सिटी पोलिसांनी ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास सुरू करण्यात आला आहे.
 
ही घटना पहिलीच नसून याआधीही अशा अनेकदा कट रचण्यात आले. रोहिमाबादमधील कैथुलिया गावानजीक अवजड वाहनाचा अढथळ निर्माण करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत, रहिमाबाद रेल्वे स्थानकानजीक दिलावरनगरजवळ दरोडेखोरांनी रुळांवर जाड लाकूड ठेवण्यात आले होते. मात्र, रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. त्या घटनेत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यावेळी निरीक्षक सुशांत गोल्प सिटी म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत आणि रेल्वे पटरीवर सुरक्षेबाबत दक्षता घेण्यात आली आहे. अशा घटना रोखण्यासाठी पाळत ठेवणे आणि गस्त वाढवण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'ती' चप्पल कोल्हापुरीच! समाजमाध्यमांवरील टीकेनंतर 'प्राडा'ने मौन सोडले

इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने..

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठीच्या समितीचा अहवाल - येत्या आठवड्याभरात राज्य सरकारला सादर करु भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची माहिती

स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली...

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121