राज्यात अतिरिक्त ८० जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या! महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

23 Apr 2025 11:19:36
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
 
महसूल विभागात गेल्या १५ ते १९ वर्षापासून उपजिल्हाधिकारी पदांवरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती. दरम्यान, आता राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. तसेच लवकरच तहसीलदारपदाचीही निवडसूची होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड श्रेणी पदी नियुक्तीचे आदेश देण्यात आले. जात पडताळणी समितीवर महाराष्ट्रभर अध्यक्ष नेमण्यात आले. उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवड श्रेणीचा दर्जा देण्यात आला तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती देऊन त्यांची पदस्थापना करण्यात आली.
 
या पदोन्नतीच्या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे भरण्यात आली आहेत. दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीत देऊन त्यातील ३४ अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे मिळण्यास गती मिळाली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0