पवन पाटील यांच्याकडे डोंबिवली पश्चिमेची जबाबदारी

22 Apr 2025 12:48:01

 
dombivali west manadal president Pawan Patil

 
डोंबिवली : ( dombivali west manadal president Pawan Patil )  डोंबिवली पश्चिममधील भाजप कार्यकर्ते पवन पाटील यांची डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड झाली आहे.
 
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आ. पवन पाटील यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंडल अध्यक्ष निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांचे विश्वासू आणि आपल्या कार्यशैलीने वरिष्ठांना दखल घ्यायला लावणारे पवन पाटील यांची पश्चिम मंडल अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
 
पवन पाटील आणि त्याच्या पत्नी भाजप पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. रक्तदान शिबीर, आधारकार्ड नोंदणी, नवीन मतदार नोंदणी, महिलांसाठी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत. कोविड काळात पाटील यांनी डोंबिवलीतील नागरिकांना मदत केली आहे. डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड झाली म्हणून पाटील यांनी पक्षातील वरिष्ठांचे आभार मानले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0