घाटकोपरमध्ये मशिदींवरील भोंग्याबाबत मोठा निर्णय! पोलिसांकडून मशिदींना नोटीस जारी

22 Apr 2025 13:58:53
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : घाटकोपरमधील मशिदींवरील भोंग्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून ध्वनिक्षेपक वापराच्या परवान्याबाबत मशिदींना नोटीस जारी करण्यात आली आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर (प) पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसमध्ये चापलूसीचे राजकारण! जो चापलूसी करेल तोच...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
 
दरम्यान, घाटकोपर पोलिसांनी सर्व मशिदींना नोटीस बजावली आहे. यानुसार यापुढे मशिदींवर भोंग्यांऐवजी १५ इंच X १० इंच बॉक्स स्पीकरच वापरता येणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेत दिलेल्या ध्ननी प्रदुषणाबाबत सूचनांचे पालन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करून ध्वनिक्षेपक यंत्रणा कायमस्वरुपी जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0