यूएईच्या CARACAL आणि भारताच्या ICOMM ने हैदराबादमध्ये सुरु केलं अत्याधुनिक लघुशस्त्रे निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

21 Apr 2025 17:16:55
 
caracal and icomm inaugurated a small arms manufacturing facility in hyderabad
 
हैदराबाद : (CARACAL and ICOMM) भारताच्या संरक्षण क्षेत्रातील 'मेक इन इंडिया' अर्थात भारतातच शस्त्रांत्रे निर्मीतीचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यूएईतील CARACAL (EDGE ग्रुपची घटक कंपनी) आणि भारतीय ICOMM (MEIL ग्रुपची सहाय्यक कंपनी) यांनी हैदराबाद येथे अत्याधुनिक लघुशस्त्र उत्पादन कारखाना सुरू केला आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत सुरु झालेला हा कारखाना यूएईमधून भारतात तंत्रज्ञान हस्तांतरणाने सुरु होणारा पहिला संरक्षण शस्त्रास्त्र प्रकल्प आहे.
 
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये:
 
या अत्याधुनिक केंद्रात CARACAL च्या अत्याधुनिक शस्त्रांचे उत्पादन होणार आहे, ज्यात रायफल्स, स्नायपर रायफल्स, सबमशीन गन्स आणि कॉम्बॅट पिस्तुल यांचा समावेश आहे.
 
प्रमुख शस्त्रे:
 
• CAR ८१६ क्लोज-क्वार्टर बॅटल रायफल
• CSR ३३८ स्नायपर रायफल
• CMP९ सबमशीन गन
 
शस्त्रांची गरज आणि उपयोग:
 
या शस्त्रांचा उपयोग भारतीय सैन्य, अर्धसैनिक दल, विशेष दल, राज्य पोलिस दल, तसेच जागतिक निर्यातीच्या गरजा पुरवण्यासाठी केला जाईल.
 
ICOMM आणि CARACAL यांची भूमिका:
 
ICOMM चे व्यवस्थापकीय संचालक सुमंत पटुरू म्हणाले, "हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून, हे उत्पादन केंद्र भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणखी पुढे नेईल." CARACAL चे सीईओ हमाद अलमेरी यांनी सांगितले की, "ही भागीदारी भारताच्या संरक्षण उद्योगाच्या वाढीस गती देण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे."
 
उद्योगाचे महत्त्व:
 
• भारतीय कौशल्य आणि अमिराती तंत्रज्ञान यांचे एकत्रीकरण:
भारताच्या जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला चालना.
 
• आत्मनिर्भर भारतासाठी अत्यावश्यक पाउल:
स्थानिक उत्पादनाची वाढ आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन.
 
• निर्यात क्षमता:
भारत आता जागतिक पातळीवर उच्च दर्जाची शस्त्रे पुरवठा करू शकेल.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0