गांधीनगर : गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या घशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला मिळाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. मात्र, तरीही कारवाईचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. ही घटना अहमदाबादमधील जमालपूरमध्ये घडली होती.
एका मशिदीत त्याच्या जवळ वक्फ बोर्डाची काही जमीन देखील आहे. ती जमीन वक्फ बोर्डाने एएमसीला दिली होती. ज्यावर महामंडळाने उर्दू शाळा स्थापन केल्या. २००१ च्या भूकंपानंतर, शाळा मोडकळीस आल्या आणि त्या पाडण्यात आल्या. दरम्यान, सलीम पठाण नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीवर शाळा स्थापन करण्याऐवजी १० दुकाने बांधली आणि ती दुकाने भाड्याने दिली आणि त्यातून येणारे भाडे गिळंकृत करण्यात आले.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सुमारे १५० घरे होती आणि विशेष म्हणजे वक्फ बोर्डाचे विश्वस्थ असल्याचा दावा करणारे सलीम खान पठाण, मोहम्मद यासर शेख, महमूद खान पठाण, फैज मोहम्मद पीर मोहम्मद आणि शाहिद अहमद शेख यांनी २० वर्षांपूर्वी या घरे आणि दुकानांकडून भाडे वसूल केले आणि बोर्डाकडे एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही. त्यानंतर, जेव्हा जमालपूरच्या रिक्षाचालक मोहम्मद रफिक अन्सारी याने पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर संबंधित प्रकरणात तपास करण्यात आला आणि तो व्यक्ती वक्फशी संबंधित नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही तो भाडे वसूल करत होता.
परिस्थिती लक्षात घेता पोलिस तक्रार दाखल करणारे मोहम्मद रफिक अन्सारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जेव्हा त्यांना कळले की, सलीम खान आणि त्यांची टोळी विश्वस्त नाहीत, तेव्हा त्यांनी ताबडतोब वक्फ बोर्डाशी संपर्क साधत या काळाबाजार विरोधात तक्रार दाखल करत गांधीनगरला गेले. त्यांनी सांगितल्यानुसार, गुजरात वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन लोखंडवाला यांच्याकडे तक्रार दाखल केली, मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही.
आता वक्फ सुधारणा या कायद्यामुळे संबंधित वक्फच्या मालकीच्या जमिनीवर विश्वस्त असल्याचा दावा करणार नाही. यामुळे मी आता भाजपचे सरकारचे मानपासून कौतुक करतो असे ते म्हणाले आहेत.