मुर्शिदाबाद हिंसेनंतर भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचा 'हिंदू बचाओ' मोर्चा, सुरक्षेसाठी परवान्यासह हत्यारे वापरण्याची परवानगी

20 Apr 2025 19:05:58

Hindu Bachao
 
कोलकाता (Hindu Bachao) : मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
 
प्रसारमाध्याने दिलेल्या अहवालानुसार, भाजप नेता सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले की, माझ्या नेतृत्वात ग्राम सुरक्षा समितीचे गठण व्हावे आणि त्यानंतर सामान्य लोकांना सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे देण्यातस यावेत, कारण ती एक बांगलादेशची सीमा आहे.
 
भाजप नेत्याने सांगितले की, माझी दुसरी मागणी अशी की, निवडणुकीदरम्यान राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, कारण मुर्शिदाबादमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत ५० टक्के घट निर्माण झाली आहे. त्यांनी हिंसा होणाऱ्या भागातस जाण्यासापासून विरोध केला. मला वास्तव माहिती आहे. केवळ विरोधकांनी मुर्शिदाबादेत जाण्यापासून रोखण्यात आले आहे, इतरांना याबाबत अनुमती देण्यात आली आहे. याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं ते म्हणाले आहेत. या प्रसंगी आता लवकरच सुनावणी करण्यात येणार आहे.
 
 
 
या मागणीच्या व्यतिरिक्त ट्विट करत सुवेंदु अधिकारी यांनी मुर्शिदाबादमधील पंडितांची व्यथा सांगत दोन घटनांना उल्लेख करण्यात आला. त्यांनी सांगितले की समशेरगंजमधील धूलियानातील गणेश घोष आणि छाया सिंग यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. कोणी पैशांचे जतन केले होते तर काहींना आपल्या लेकरांच्या विवाहासाठी आर्थिक तजवीज करून ठेवली होती.
 
सुवेंदु अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही परिवारांना मदत करण्यास सांगितली होती. एकाला पाच लाख आणि एकाला दीड लाख रुपये देण्यात आले. या दोन्ही कुटुंबांचा वक्फशी काहीही संबंध नव्हता हे विचार करण्यासारखे आहे. त्यांचा गुन्हा फक्त एवढाच होता की ते हिंदू होते.
 
 
Powered By Sangraha 9.0