JEE Main 2025 Toppers List : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल शनिवार दि. १९ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या यादीत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे ज्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्रातील आयुष रवि चौधरी, सानिध्य सराफ आणि विशाद जैन हे तिघेही १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक ७ विद्यार्थी राजस्थानचे आहेत. तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तरप्रदेशमधील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा समावेश या यादीत आहे. पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात येथील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील प्रत्येकी एक विद्यार्थींचा समावेश आहे.
परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी:
१) मोहम्मद अनस - राजस्थान
२) आयुष सिंघल - राजस्थान
३) आर्किसमन नंदी - पश्चिम बंगाल
४) देवदत्त माझी - पश्चिम बंगाल
५) आयुष रवी चौधरी - महाराष्ट्र
६) लक्ष्य शर्मा - राजस्थान
७) कुशाग्र गुप्ता - कर्नाटक
८) हर्ष गुप्ता - तेलंगणा
९) आदित प्रकाश भेगडे - गुजरात
१०) दक्ष - दिल्ली
११) हर्ष झा - दिल्ली
१२) रजित गुप्ता - राजस्थान
१३) श्रेयस लोहिया - उत्तर प्रदेश
१४) सक्षम जिंदाल - राजस्थान
१५) सौरव - उत्तर प्रदेश
१६) वनगाला अजय रेड्डी - तेलंगणा
१७) सानिध्य सराफ - महाराष्ट्र
१८) विशाद जैन - महाराष्ट्र
१९) अर्णव सिंग - राजस्थान
२०) शिवेन विकास तोष्णीवाल - गुजरात
२१) कुशाग्र बांघा - उत्तर प्रदेश
२२) साई मनोगना गुठीकोंडा - आंध्र प्रदेश
२३) ओम प्रकाश बेहरा - राजस्थान
२४) बानी ब्रता माझी - तेलंगणा