अमेरिकेत 'इस्लामिक शहर' वसवण्याचा डाव राज्यपालांनी उधळला!

19 Apr 2025 12:19:40

EPIC City Texas News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (EPIC City Texas News)
अमेरिकेत इस्लामिक शहर उभारू पाहणाऱ्या एका समुहाला चांगलाच झटका बसला आहे. इस्लामिक शहरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची विविध स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. तब्बल ४०० एकर परिसरात हे इस्लामिक शहर उभारून तिथेच स्थायिक होण्याचा अनेकांचा विचार होता. त्यासाठी जमीन विकत घेतली असून अनेकांनी त्यावरील प्लॉटसुद्धा खरेदी केले होते. याठिकाणी होणारे सर्व व्यवहार इस्लामिक नियम आणि कायद्यानुसार करावे लागणार होते. मात्र अमेरिकेच्या नेत्यांनी विशेषतः राज्यपालांनी इस्लामिक शहराला विरोध केल्याचे दिसते आहे.

हे वाचलंत का? : पश्चिम बंगालमध्ये 'हिंदू बचाव' रॅलीला उच्च न्यायालयाची परवानगी, ममता बॅनर्जींना पोटशूळ

अमेरिकेच्या टेक्सास राज्याशी संबंधित हे संपूर्ण प्रकरण असून राज्याच्या प्लानो शहरातील 'इस्ट प्लानो इस्लामिक सेंटर' या मशिदीच्या समितीचा हे इस्लामिक शहर वसवण्याचा मानस होता. 'इस्ट प्लानो इस्लामिक सेंटर' ही टेक्सासमधील सर्वात मोठी आणि श्रीमंत मशिदींपैकी एक आहे. मशिदीतील काही बँकर्सच्या मदतीने सदर ४०० एकर जमीन खरेदी केली होती. ईपीआयसी सिटी वेबसाइटनुसार, शहराची योजना इस्लामलाच पुढे ठेऊन करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकल्पात अमेरिकेतील इस्लामचे पालन करणाऱ्यांना खूप रस होता. त्यामुळे या इस्लामिक शहरातील भूखंडांची झपाट्याने विक्री होत होती. या शहरात सुमारे ४५० जणांनी प्लॉट बुक केले होते. त्यासाठी त्यांनी बक्कळ पैसाही ओतला होता, जेणेकरून वेळ पडेल तेव्हा या इस्लामिक शहरात स्थायिक व्हावे. मात्र इस्लामिक शहराची आता अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे. टेक्सासचे ॲटर्नी जनरल केन पॅक्सटन यांनी या प्रकरणाच्या चार वेगवेगळ्या तपासाचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकारानंतर या शहराचे भवितव्य धोक्यात आले आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर असे शहर उभारण्यातीची शक्यता आणखी कमी झाली आहे.

कशी होती इस्लामिक शहराची रचना
शहरात एकूण १००० घरे बांधली जाणार होती. त्यासोबतच अनेक निवासी इमारतीही बांधण्यात येणार होत्या. मदरसे, शाळा, एक महाविद्यालय आणि मशिदी इत्यादी बांधण्याचीही योजना होती. याशिवाय ईदची नमाज अदा करण्यासाठी मैदानही तयार करण्यात येणार होते. या इस्लामिक शहरातील सर्वात लहान भूखंडाची किंमत सुमारे $२ लाख (अंदाजे ₹१.७० कोटी) ठेवण्यात आली होती. त्यांची किंमत $५ लाखांपर्यंत जाईल. मशिदीच्या जवळ प्लॉटची किंमत जास्त ठेवण्यात आली होती. मशिदीजवळील भूखंड १५% पर्यंत प्रीमियमने विकले जाणार होते.

काय म्हणाले राज्यपाल?
टेक्सास राज्याचे राज्यपाल ग्रेग ॲबॉट हे या शहराच्या वसाहतीच्या विरोधात आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की ते टेक्सासमध्ये 'इस्लामिक शहर' स्थापन होऊ देणार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही शहराला परवानगी दिली जाणार नाही. राज्यपालांनी सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्थानिकांची निदर्शने
अमेरिकेत पूर्णपणे इस्लामिक शहर स्थापन होत असून इतर धर्माच्या लोकांना येथे स्थान दिले जात नसल्याबद्दल अनेकांनी त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर या इस्लामिक शहराविरोधात निदर्शने सुरू झाली. अमेरिकेच्या कायद्यानुसार, इतर कोणत्याही धर्माच्या किंवा रंगाच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात स्थायिक होण्यापासून रोखता येत नाही; यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

Powered By Sangraha 9.0