लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ग्रेटर नोएडामध्ये चिपियाना गावामध्ये दानिश नावाच्या एका व्यक्ती बिर्याणी विक्री करत होता. दानिश हॉटेल मालक कुलदीप यांच्या असलेल्या दुकानातच वास्तव्य करायचा. ११ एप्रिल २०२५ रोजी दानिशने आपल्या मालकाच्या पत्नीला घेऊन तो फरार झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले. चार दिवसानंतर १५ एप्रिल रोजी दानिशने महिलेला पुन्हा सोडण्यास तो आला असता कुलदीपने पाहिले आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत दानिश जखमी झाला, त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणात दानिशने कुलदीप आणि त्याच्या कुटुंबिया विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले. यानंतर आता पोलिसांनी कुलदीपला ताब्यात घेतले होते. यानंतर कोतवाली पोलिसांनी म्हणणं होतं की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि कारवाई करत मुख्य आरोपी कुलदीपला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पुढील कारवाई लवकरात लवकर केली जाईल.