सहकार भारतीतर्फे सहकार क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित होणार

18 Apr 2025 18:14:55
sahakr
 
 
मुंबई : देशातील सहकार क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी, जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गिरगाव मुंबई येथे ‘जागृती आणि रोजगार काळाची गरज’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शनिवार १९ एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील महिलांचे योगदान, सहकार क्षेत्रातील महिलांसाठीच्या रोजगार संधी, सहकार क्षेत्रातील महिलांची भूमिका या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे कौशल्य व विकास, नाविन्यता, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख शरदजी जाधव असणार आहेत. या कार्यक्रमात सहकार भारती मुंबईचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
 
  
Powered By Sangraha 9.0