निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांना अटक!

18 Apr 2025 19:29:52
 
Ranjit Kasle
 
मुंबई : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर असल्याचा दावा करणारे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांना गुरुवार, १८ एप्रिल रोजी बीड पोलिसांनी अटक केली आहे.
 
संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत रणजीत कासले यांनी मोठा दावा केला होता. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड नको होते. त्यामुळे त्यांनीच मला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर दिली होती, असा दावा रणजीत कासले यांनी केला होता.
 
हे वाचलंत का? -  बिडवलकर हत्या प्रकरणात वैभव नाईकांचा हात? निलेश राणेंचा आरोप
 
त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रणजीत कासले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ते गायब झाले होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे पुण्यात दाखल झाल्यानंतर आपण आत्मसमर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतू, त्याआधीच एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना बीड पोलिसांनी रणजीत कासले यांना ताब्यात घेतले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0