दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?
18 Apr 2025 15:02:22
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (PM talk with Dawoodi Bohra community) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले.
पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान शिष्टमंडळाने दाऊदी बोहरा समुदायाशी पंतप्रधानांचे असलेले दीर्घकालीन संबंध व त्यांनी आपल्या समुदायासाठी केलेल्या सकारात्मक कार्याबद्दल सांगितले. वक्फ दुरुस्ती कायद्याचा आपल्या समाजाला मोठा फायदा होईल, असे त्यांना खास अधोरेखित केले. पंतप्रधानांनी हा कायदा केवळ अल्पसंख्याकांसाठीच नाही तर अल्पसंख्याकांमधील अल्पसंख्याकांसाठी आणला आहे. ते म्हणाले की भारताने नेहमीच त्यांची ओळख वाढू दिली आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्यांना समावेशाची भावना वाटते.
पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांसोबतचे त्यांचे पूर्वीचे संबंध आठवले. समाजकल्याणासाठी काम करण्याच्या समाजाच्या परंपरेची त्यांनी प्रशंसा केली. कायदा आणण्यात समाजाच्या विशेष योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, जेव्हा वक्फ दुरुस्ती कायदा आणण्याच्या दिशेने काम सुरू झाले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ज्या लोकांशी चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन, ज्यांनी कायद्याच्या विविध बारकाव्यांबद्दल तपशीलवार टिप्पण्या देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.