कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मुस्लिमांनी हिंसाचारादरम्यान ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
अशातच आता राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस हिंसाचारग्रस्त विभागात दौरे करत आहेत आणि पीडित हिंदूंचीही भेट घेणार आहेत. गुरूवारी १७ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांशी बोलताना सांगितले की, तुमचा मुर्शिदाबाद दौरा पुढे ढकलण्यात आला. सांगण्यात येत आहे की, वक्फ कायद्याचे कारण पुढे करून हिंदूंवर अन्याय अत्याचाराचे सत्र कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, आता पश्चिम बंगालमध्ये 'हिंदू बचाव' रॅलीला उच्च न्यायालयाने परवानगी देण्यात आली असल्याने ममता बॅनर्जींना पोटशूळ उठले आहे.
देवी-देवतांच्या मूर्ती घडवणाऱ्या हरगोविंद दास आणि त्यांचे पुत्र चंदन दास यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. राज्य सचिवालयाने नबान्नने बोलताना ममता बॅनर्जीने सांगितले की, विश्वास संपादन करण्याची मोहिम सुरू असून अशातच गव्हर्नरने सांगितले मी जाऊ इश्चित नाही. ममता बॅनर्जीने उदाहरण दिले, त्यांनीही त्यात भाग घेतलेला नाही. राज्यपाल बोस म्हणाले की, ग्राउंडवर जाऊन वास्तविकदृष्ट्या विश्लेषण करण्यासाठी मुर्शिदाबादमध्ये निश्चितच जाणार आहे. ते म्हणाले की, स्थानिक म्हणाले बीएएसएफ कॅम्प स्थापन करणाऱ्यांची मागणी आहे की, आपल्याला याबाबत प्रयत्न करावा लागणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडता कामा नये.
वकिलांना पीडितांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. प्रियंका टिबरेवाल यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात चौकशीचे पर्यवेक्षण करण्यात येईल. अशातच केंद्रीय सुरक्षा रक्षकांना तैनात राहण्याचे सांगण्यास सांगितले आहे. कोलकाता भारतीय जनता युवा मोर्चास शेव बंगाली हिंदूज मोर्चा काढण्यास अनुमती देण्यात आली.