मुंबई : विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच अशा शब्दात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उबाठा गटाच्या नाशिक येथील मेळाव्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवण्यात आले. यावर आता सर्वत्र टीका होत आहे.
हे वाचलंत का? - येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी! पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीही अनिवार्य
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "सत्तेच्या स्वार्थासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता महाराष्ट्र अजिबात विचारत नाही. त्यामुळेच आपलेच विचार AI च्या मदतीने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात उतरवण्याचा करंटेपणा आज उद्धव ठाकरे यांनी केला. 'विनाशकाले विपरीत बुद्धी' म्हणतात ते हेच. जर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर 'जनाब' उद्धव ठाकरेंची वैचारिक दिवाळखोरी बघून साहेब काय गरजले असते याचा विचार करा," असे ते म्हणाले.