हैदराबाद : तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता एका आयएएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एआय जनरेट फोटो शेअर केल्याने अधिकाऱ्यालाच नोटीस बजावण्यात आली आहे. अधिकाऱ्याचे नाव स्मिता सभरवाल असे आहे.
स्मिता सभरवाल यांनी ३१ मार्च रोजी जेसीबी आणि इतर यंत्र, दोन हरीण आणि एक मोराचे चित्र दिसणारे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, १२ एप्रिल रोजी आयएसएस अधिकाऱ्याला कलम १७९ बीएनएस अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तेलंगणा कॅडरचे अधिकारी सध्या पर्यटन आणि संस्कृती प्रधान सचिव आहेत.
शहरी पायाभूत सुविधा आणि आयटी पार्कच्या बांधकामासाठी या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तेलंगणा सराकरने घेतला आणि विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.
पर्यावरणीय संवर्धनाच्या चिंतेचा हवाला देऊन विद्यार्थी गट आणि पर्यावरण प्रेमींनी या जागेवरील प्रस्तावित विकासाला विरोध दर्शवला आहे.
तेलंगणा सरकारने पूर्वीच सांगितले होते की, कांचा गचिबोवलीतील ४०० एकर जमीन ही त्यांचीच आहे. या प्रकरणाची तेलंगणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.