मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Murshidabad Voilence SIT Inquiry) वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नसल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतल्यानंतर राज्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला. या घटनेच्या चौकशीसाठी सध्या नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गुप्तचर शाखा), दोन उपअधीक्षक - एक दहशतवाद विरोधी दल (CIF) आणि दुसरा गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पाच निरीक्षक तसेच इतर अधिकारी यांचा समावेश आहे.
हे वाचलंत का? : देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!
मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास सध्या सुरु आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे इस्लामिक धर्मगुरूंची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी मुर्शिदाबाद हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. मुर्शिदाबादमधील हिंसाचारानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफच्या अनेक तुकड्या तैनात केल्या. अशी माहिती आहे की, आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली असून मुर्शिदाबादच्या समसेरगंज, धुलियान आणि इतर प्रभावित भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.