"आधी काश्मीरवरील बेकायदेशीर ताबा सोडा"; पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारतानं सुनावलं!

17 Apr 2025 19:45:29
 
India Slams Pakistan Army Chief General Asim Munir
 
नवी दिल्ली : (India Slams Pakistan Army Chief General Asim Munir) पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीर आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर भारताने मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देत चांगलेच खडेबोल सुनावले आहे. काश्मीर ही इस्लामाबादच्या गळ्याची नस असल्याचे जनरल मुनीर यांनी म्हटले होते.
 
"काश्मीरवरील बेकायदेशीर ताबा लवकरात लवकर सोडावा"
 
यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी उत्तरात म्हटले आहे की, "पाकिस्तानने काश्मीरमधील काही भागावर केलेले बेकायदेशीर अतिक्रमण हा एवढाच संबंध काश्मीर आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. मुळात कोणताही परप्रांत हा एखाद्याच्या गळ्याची नस कसा असू शकतो? पाकिस्तानशी त्या प्रदेशाचा संबंध म्हणजे त्यावर बेकायदेशीर ताबा जो त्यांनी लवकरात लवकर सोडावा"
 
"दहशतवादाचे केंद्र म्हणून पाकिस्तानची ओळख पुसली जाणार नाही"
 
पराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत जयस्वाल पुढे म्हणाले की, "पाकिस्तान खूप प्रयत्न करेल, परंतु जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून असलेली त्यांची ओळख पुसली जाणार नाही."
 
Powered By Sangraha 9.0