एनएसएस शिबिरात १५० विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रकार!

नमाज पडण्यास समन्वयकाची जबरदस्ती; पोलिसांकडून कारवाईला वेग

    16-Apr-2025
Total Views |

Chhattisgarh NSS Camp Conversion Case

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (NSS Camp Conversion Case) 
छत्तीसगडच्या बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एनएसएस शिबिरात जबरदस्ती नमाज पठण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दि.३० मार्च रोजी ईदच्या दिवशी शिबिरात आलेल्या १५५ हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्ती नमाज पढायला लावल्याचा आरोप आहे. शिबिरात एकूण १५९ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४ जणं एका विशिष्ट धर्माचे होते. त्यांना सुरुवातीला मंचावर नमाज अदा करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर एनएसएस समन्वयकाने उर्वरित विद्यार्थ्यांना तीच कृती पुन्हा करण्यास भाग पाडले.

हे वाचलंत का? : तामिळनाडूत १५० कुटुंबांना वक्फ बोर्डाची नोटीस; काँग्रेस आमदाराचा सल्ला म्हणजे ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व सुरु असताना सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते, त्यामुळे थेट व्हिडिओ पुरावा नाही. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याबाबत नंतर खुलासा केला असता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सध्या विद्यापीठ प्रशासनाकडून २४ तासांच्या आत सदर प्रकरणी जबाब मागवला आहे.

अशी माहिती आहे की, एनएसएसचे शिबिर दि. २६ मार्च ते ०१ एप्रिल पर्यंत चालले. ३० मार्च रोजी नमाज पढण्याची घटना घडली. त्यानंतर एनएसएस समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. विरोध केल्यास शिबिराचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने ही बाब गांभीर्याने घेतली असून यासाठी त्रिसदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. ती लवकरच आपला अहवाल सादर करेल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना ही घटना अधिक चिंताजनक आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये एखाद्या विशिष्ट धर्माची प्रार्थना किंवा धार्मिक कार्य करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा ते त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करतेच पण समाजात तणाव आणि विसंगती देखील वाढवते.