कट्टरपंथींसमोर युनूस सरकारने टेकले गुडघे; नव्या वक्फ कायद्याविरोधात 'खिलाफत मजलिस' रस्त्यावर उरतणार

    16-Apr-2025
Total Views |

Khilafat Mazlis Against New Waqf Law

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Khilafat Mazlis Against New Waqf Law) 
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी पूर्णपणे कट्टरवाद्यांसमोर शरणागती पत्करल्याचे दिसते आहे. त्यांनी हिंदूंवरील सर्व प्रकारच्या दडपशाहीकडे डोळेझाक केली आणि एकामागून एक त्याचे निर्णय हिंदू आणि भारताच्या विरोधात असल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळेच भारताचा द्वेष करणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशांशी जवळीक वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बंगाली नववर्षाच्या पारंपारिक हिंदू उत्सवालाही त्यांनी इस्लामी रंग दिला आहे. विशेषतः खिलाफत मजलिस, कट्टरपंथीयांचा एक गट, भारताच्या वक्फ विधेयकाविरोधात दि. २३ एप्रिल रोजी बांगलादेशात जुलूस काढणार असल्याचे समोर आले आहे.

हे वाचलंत का? : एनएसएस शिबिरात १५० विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रकार!

मजलिसच्या प्रस्तावित निषेधाच्या घोषणेने साहजिकच बांगलादेशच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील खिलाफत मजलिस या इस्लामिक राजकीय संघटनेने ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाकडे निषेध मोर्चा काढण्याची योजना आखली आहे. 'भारतातील मुस्लिमांच्या धार्मिक हक्क आणि वक्फ मालमत्तेवर होत असलेल्या कथित हल्ल्यांविरोधात आवाज उठवणे' हा या निदर्शनाचा उद्देश आहे.

खिलाफत मजलिसचे प्रमुख मौलाना ममुनुल हक यांनी आरोप केला आहे की, 'हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांमध्ये आणि शरिया कायद्यात हस्तक्षेप करते.' 'या विधेयकाद्वारे वक्फ मालमत्तेवरील बेकायदा कब्जांना कायदेशीर वैधता दिली जात आहे,' असा त्यांचा दावा आहे. खिलाफत मजलिसने आपल्या केंद्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या निषेधाची योजना आखली. भारतीय उच्चायुक्तालयावर मोठा निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निदर्शनात या धार्मिक गटाचे सरचिटणीस, ज्येष्ठ नेते आणि इतर प्रमुख सदस्य सहभागी होणार आहेत.