मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

    14-Apr-2025
Total Views |

Waqf Amendment Act
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून होत आहेत.
माध्यमाने सांगितले की, इस्लामी जमावाने अचानकपणे हिंदूंच्या दुकानांना टार्गेट केले आणि हल्ला केला. पीडित व्यक्तीने सांगितले की कोणत्याही हिंदू कुटुंबाला राहू देणार नाही. त्यानंतर दुकानांमधील वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला आणि सामान लूटण्यात आले, लाकडी वस्तूंना आग लावण्यात आली.
 
 
पीडित व्यक्तीने सांगितले की, बाजारातील कोणत्याही मुस्लिम दुकानाचे नुकसान झाले नाही. केवळ हिंदूंच्या दुकानांना आणि त्यांच्या संपत्तींना इस्लामी जमावाने लक्ष्य केले आहे. एका पीडित व्यक्तीने सांगितले की, इस्लामी जमावाने हिंसक परिस्थितीत काही स्फोटकांचा वापर केला. तसेच काहींच्या घरात लाठ्या काठ्या आणि हत्यारे घेऊन जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
अशातच आता मुर्शिदाबादमधून मालदाकडे आपला बचाव करण्यासाठी हिंदूंनी स्थलांतरणास सुरूवात केली आहे. आतापर्यंत एकूण ५०० हिंदूंनी स्थलांतरण केल्याचे सांगितले आहे. मालदामधील वैष्णवनगरमध्ये दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मालदामध्ये दाखल झालेल्या हिंदूंना इतर काही हिंदू मदत पुरवत आहेत. दरम्यान, मुर्शिदाबादमध्ये उफाळलेल्या हिंसेमुळे बीएसएफ वर हल्ला केला आहे.