जर वक्फच्या संपत्तीवर नजर ठेवल्यास डोळे काढू आणि हात तोडू!, तणृमूल काँग्रेस नेत्याची खुलेआम धमकी

    14-Apr-2025
Total Views |

Waqf Amendment Bill
कोलकाता : पश्चिम बंगालध्ये वक्फ संशोधन कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदरने भडकाऊ भाषण करत विधान केले आहे. दक्षिण परगनामध्ये एका सभेदरम्यान हलदरने वक्फ संपत्तीवर नजर ठेवल्यास आम्ही डोळे काढू आणि हात तोडून टाकण्याची धमकीच दिली आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजूमदारांविरोधात कारवाईची मागणी केली.
टीएमसी पक्षाच्या मजमूदार या नेत्याने पश्चिम बंगालच्या मु्र्शिदाबादमधील निदर्शकांना धर्मांध कट्टरपंथी जिहादी गट असे संबोधले आणि आरोपही करण्यात आला की, वक्फ सुधारणा कायद्याविरोधात निषेध करण्याचा एक बहाणा असल्याचे बोलले जात आहे.
 
त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पावित्रा घेत हलदरवर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांनी दावा केला की, हे लोक हिंदूंविरोधात हिंसाचाराचे सत्र घडवून आणत आहेत. तसेच बीएएसएफ जवानांवर पेट्रोल बॉम्ब फेकत आहेत. मुजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टार्गेट केले आहे. भाजपने या कृतीला हिंदूविरोधी निती असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही.