चंदीगड : (PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
"काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केले"
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ एप्रिल रोजी हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी विमानतळावरच जाहीर सभेला संबोधित केले. सभेत बोलत असताना यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले , "देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वक्फ कायदा २०१३ पर्यंत लागू होता. २०१३ मध्ये काँग्रेसने निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून कायद्यात सुधारणा केली. आरक्षणाचे फायदे एससी/एसटी आणि ओबीसी समुदायांपर्यंत पोहोचले आहेत की नाही हे तपासण्याची काँग्रेसने कधीही तसदी घेतली नाही...राजकारण करण्यासाठी काँग्रेसने सरकारी निविदांमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी कायदा आणला. तेव्हाचडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केले, काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवले."
#WATCH | Hisar, Haryana | PM Modi says, "Congress...Congress made the Constitution a tool for gaining power. During Emergency, the spirit of the Constitution was killed to retain power. The Constitution talks about a secular civil code, but Congress never implemented it. Today,… pic.twitter.com/asvVx2qQV3
"...तर मुस्लिमांना पंक्चर सायकली दुरुस्त करण्याची गरज पडली नसती"
"देशभरात वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. या जमिनीचा फायदा गरीब, असहाय्य महिला आणि मुलांना व्हायला हवा होता. जर त्याचा योग्य वापर केला असता तर मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करण्याची गरज पडली नसती. याचा फायदा फक्त भू-माफियांना झाला. हे माफिया या कायद्याद्वारे गरिबांच्या जमिनी लुटत होते." अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\