अमेरिकेत हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविरोधात विधेयक सादर!

    12-Apr-2025
Total Views |

 Hinduphobia
 
वॉशिंग्टन : अमेरिकेत हिंदूंविरोधात (Hinduphobia)  घृणा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी काही कायदे बनवले जावेत. हिंदूफोबिया विरूद्ध अमेरिकेतली जॉर्जिया राज्यात हे विधेयक आणले गेले आहे. हिंदूंच्या संरक्षणाच्या हितासाठी विधेयक आणणारे पहिले अमेरिकेतील राज्य हे जॉर्जिया आहे. यामुळे आता अमेरिकेतील हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
 
जॉर्जियामधील सीनेटमध्ये हिंदूफोबिया विरूद्ध लढण्यासाठी हे विधेयक पारित करण्यात आले. संबंधित विधेयकाचे नाव हे SB375 असून ४ एप्रिल २०२५ रोजी जॉर्जिया प्रांतातील सीनेटमध्ये ते सादर करण्यात आले. अशातच आता या विधेयकावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या कायद्याच्या सीनेटमध्ये डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन सदस्यांनी समर्थन दिले आहे.
 
"गेल्या काही वर्षांत, देशभरात हिंदूंविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे," असे सिनेटर स्टील म्हणाले. हा प्रस्ताव सीनेटकडे पास करण्यात आलेला नाही, जर हा प्रस्ताव पारित करण्यात आला असता तर जॉर्जियामधील मूळ कायद्यात बदल करावा लागेल. हिंदूंवर अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कारवाईचे आदेश देण्यात येतील. हिंदूंच्या संरक्षणेसाठी नवीन नियम बनवण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
हे विधेयक पारित करण्याच्या परिस्थितीत खलिस्तानी आणि इस्लामी हिंदूंना त्रास देणार नाहीत. जॉर्जियामध्ये विधेयक पारित झाल्यास अमेरिकेच्या इतर राज्यांमध्ये हे विधेयक पारित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, जॉर्जियामध्ये सर्वाधिक हिंदू हे अमेरिकेत २५ लाखांहून हिंदू आहेत.
 
अमेरिकेत याआधी अनेकदा हिंदू आणि त्यांच्या मंदिरांवर त्यांच्या अवस्थेवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच खलिस्तान्यांनी तसेच अमेरिकेच्या सैन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमध्ये हिंदूद्वेषी घोषणाबाजी करण्यात आल्या होत्या.