उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

    11-Apr-2025
Total Views |

Weather Update
 
नवी दिल्ली (weather update) : देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हानी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब्बल ८३ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. ज्यात ६१ जण हे बिहारमधील आहेत आणि इतर २२ जण हे उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, असाम, मेघालयात ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारच नाहीतर उत्तराखंडमधील चमोलीमध्ये गुरूवारी ढगफुटी झाली. त्यानंतर भूस्खलनही निर्माण झाले आणि त्यामुळे काही वाहनंही जमिनीखाली गाडली गेल्याचे चित्र दिसून आले. 
 
 
 
सध्या उन्हाळा ऋतु सुरू आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये अंगाची लाहीलाही होताना दिसते. अधिकता राज्यात गुरूवारी उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसहून अधिक वाढला होता. राजस्थानातील बाडमेरमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमान होते. अशातच दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात उन्हाचा पारा हा ३५ अंश सेल्सिअस आहे. राजस्थान-गुजरातमध्ये ४०-४३ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील जैसलमेर-बाडमेर, गुजरातचे सौराष्ट्र-कच्छ, प. उत्तर प्रदेश. पंजाब, दिल्लीत उष्णतेची लाट राहणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये उष्णतेने अंगाची लाही लाही होणार आहे.