हातात बेड्या अन् पायात साखळदंड, तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देतानाचे फोटो आले समोर!

11 Apr 2025 13:11:51
 
us marshals in the central district of california transferred the custody of tahawwur rana to representatives from india.
 
 
नवी दिल्ली : (Tahawwur Rana Extradition) २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने कडक सुरक्षेत कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे विमान संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी एनआयए कोठडीत करण्यात आली आहे.
 
हातात बेड्या अन् पायात साखळदंड
 
तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला. या फोटोत राणा एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे दिसत आहे. तसेच अमेरिकन अधिकाऱ्यांकडून तहव्वूर राणाचे भारतीय अधिकाऱ्यांकडे हस्तांतरण करतानाचे फोटोही आता समोर आले आहेत. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील यूएस मार्शलनी पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणाचा ताबा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडे सोपवला होता. त्यावेळी राणाचे हात आणि पाय साखळदंडांनी बांधल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
 
एनआयएच्या अटकेनंतर तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, एनआयएने कटाचा उलगडा करण्यासाठी राणाच्या २० दिवसांच्या कोठडीची मागणी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने एनआयएला तहव्वूर राणाची १८ दिवसांची कोठडी दिली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0