अहमदाबाद: ( steel bridge launched bullet train project ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशा वेळी या प्रकल्पासाठी दहा हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लॉन्च करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन ‘डीएफसीसीआयएल’ ट्रॅकवर ७० मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला. मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी हा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
या संपूर्ण कॉरिडॉरसाठी नियोजित २८ स्टील पुलांपैकी गुजरातमधील प्रकल्पासाठी पूर्ण झालेला हा सातवा स्टील पूल आहे. या सात स्टील पुलांच्या बांधकामात दहा हजार मेट्रिक टनांहून अधिक स्टीलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे भारतातील स्टील उद्योगाला लक्षणीय चालना मिळेल.
१३ मीटर उंच आणि १४ मीटर रुंद असलेला ६७४ मेट्रिक टन स्टीलचा हा पूल कोलकात्यातील दुर्गापूर येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आणि स्थापनेसाठी ट्रेलरमधून साईटवर नेण्यात आला. हा पूल ४९ मीटर लांबीच्या लॉन्चिंग नोजचा वापर करून लॉन्च केला जातो, ज्याचे वजन अंदाजे २०४ मेट्रिक टन आहे.
पूलाच्या निर्मितीत सुमारे २८ हजार, ८०० संख्या टॉर-शियर प्रकार उच्च ताकद (टीटीएचएस) बोल्ट्सचा वापर केला गेला आहे. ज्यामध्ये सी-५ सिस्टम पेंटिंग आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्सचा समावेश होता. हा पूल १०० वर्षांच्या आयुर्मर्यादेसह डिझाईन करण्यात आले आहे. हा स्टील पूल १८ मीटर उंचीवर तात्पुरत्या ट्रेसल्सवर जमिनीपासून उभा करून असेंबल केला गेला आणि तो दोन सेमी-ऑटोमॅटिक जॅकच्या स्वयंचलित यंत्रणेद्वारे, प्रत्येकाचा क्षमता २५० टन, मॅक-अलॉय बार वापरून खेचला गेला.
‘डीएफसीसी’ ट्रॅकवर अधूनमधून ब्लॉक असताना १२ तासांत पुलाचे प्रक्षेपण पूर्ण झाले. पूल सुरू करताना सुरक्षितता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक ब्लॉक आवश्यक आहेत, जे मालवाहतूक सेवांमध्ये व्यत्यय कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने केले जाते.